कृषि उत्पन्न बाजार समिती,धामणगांव रेल्वे

शेतक-यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाने पुर्वीच्या कायद्यात आमुलाग्र बदल करुन त्यात शेतक-यांच्या हिताच्या अनेक दुरुस्त्या करण्यात आलेल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना हैद्राबाद प्रेसीडेन्सी ऑर्डर नोटीफीकेशन क्र.79/Aदिनांक 1 एप्रिल 1898 रोजी झाली असुन सदरहु बाजार समितीने शतकोत्तर 28 वर्ष यशस्वीपणे पुर्ण केली आहेत. या बाजार क्षेत्रातील समस्त शेतकरी बांधवांकरीता ही भुषणावह बाब आहे.

सर्व्हे नं. 15.3 हे.19 आर जागा कापुस बाजार म्हणुन घोषीत करण्यात आली.सदर आदेशान्वये स्थापन झालेल्या बाजार क्षेत्राची मर्यादा त्यावेळच्या बेरार कॉटन ॲण्ड ग्रेन मार्केट लॉ चे कलम 4 अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रुल्स 54(2) खाली काढण्यात आलेल्या नोटिफीकेशन क्र.5893 –XIV दिनांक 05/07/1933 अन्वये कॉटन मार्केटची एरीया दिड मैल रेडीयस (गोलाकार)अशी वाढविण्यात आली.

दरम्यान याच कार्यक्षेत्रातील नोटीफिकेशन क्र.108-754-XIVदिनांक 20 जानेवारी 1930 रोजी बेरार कॉटन ॲण्ड ग्रेन मार्केट लॉ 1897 चे सेक्शन 2 अंतर्गत एक स्वतंत्र धान्य बाजार समिती अधीसुचित करण्यात आली व तिचे स्वतंत्र कार्य व प्रशासन एकाच कार्यक्षेत्रात सुरु राहील.

महाराष्ट्र शेतीच्या उत्पन्नाची खरेदी विक्री (नियमनि) अधीनियम 1963 व त्याखालील नियम 1967 ची अंमलबजावणी सुरु झाली.याच कायद्याचे अधीन दोन स्वतंत्र बाजार समितीचे प्रशासकिय खर्चाच्या मर्यादा कमी करुन अधीसुचना क्र.CMR/R/7/1971, dated 30/04/1971 अन्वये दिनांक 3 मे 1971 पासुन संपुर्ण जुन्या चांदुर तालुक्यातील (ज्यावेळी आजच्या धामणगांव व तिवसा तालुक्यातील गावे चांदुर तालुक्यात समाविष्ट होती.) एक बाजार समिती धामणगांव रेल्वे येथे स्थापन करण्यात आली. पुणे तालुका स्तरावर स्वतंत्र बाजार समितीची स्थापना व्हावी या मागणीमुळे या समितीच्या कार्यक्षेत्राचे विभाजन हनि अधीसुचना क्र.CMR/R/12चांदुर रेल्वे 1974 दिनांक 22/10/1974 अन्वये चांदुर रेल्वेवि अधीसुचना क्र.DIG/RGM/TEOSA/1981 दिनांक 08/04/1981 दिनांक 08/04/1981 अन्वये तिवसा येथे स्वतंत्र बाजार समिती अस्तीत्वात आली.सन 1998 मध्ये महाराष्ट्र शासनाने धामणगांव रेल्वे ला तहसील चा दर्जा प्रदान केल्याने 112 गावांचा तालुका नव्याने निर्माण झाला.मा.जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,अमरावती यांचे अधीसुचना क्र.पणन-1/कृउबास/अंतिम अधीसुचना/9730/2001 दिनांक 12 जुलै 2001 अन्वये कार्यक्षेत्रासंबंधीतल अंसदिग्धता दुरु होऊन या समितीचे कार्यक्षेत्र नविन धामणगांव तालुका इतके निश्चीत करण्यात आले सध्या समितीचे कार्यक्षेत्रात 112 गावांचा समावेश आहे.

शेतीमालाचे नियमन

शासनाच्या सहकार व पणन खात्याच्या अधीसुचने अंतर्गत या बाजार समितीने शेतीमालाचे नियमन अधीसुचीत केले आहे.
अ) अधीसुचना क्रमांक/ सीएमआर/आर-7 दि.30/04/1971 अन्वये

  • ज्वारी
  • गव्हु
  • हरबरा
  • तुर
  • मुंग
  • बाजरी
  • उडीद
  • येरंडी
  • तीळ
  • करडी
  • जवस
  • अंबाडी
  • भुईमुंग (फोडलेला)
  • भुईमुंग (न फोडलेला)
  • सरकी
  • ओवा
  • धान
  • मका
  • सावी
  • मांस
  • मोट
  • दाळी
  • कुळथी
  • चवळी
  • मसुर
  • वाटाणा
  • कांदा
  • कुक्कुटपालन
  • जनावरे
  • धने
  • राई
  • तुर
  • हाडे
  • कातडी
  • हळद
  • गोंद
  • चिंच
  • मेथी
  • बांबु
  • गवत
  • कडबा
  • कापुस
  • रुई
  • गुळ
  • मिरची
  • साखर
  • खाद्यतेल
  • संत्रा
  • सोयाबीन
  • दाळी (व्दीदल धान्यापासुन केलेल्या)
  • उस
  • कांदे
  • बटाटे
  • टमाटे
  • सुर्यफुल
  • आंबा
  • मोसंबी
  • निंबु
  • खरबुजे
  • केळी

बाजार आवारातील दैनंदिन हर्रास होणार शेतमाल

अ.क्र. शेतमाल प्रकार
सोयाबीन
चना
तुर
गव्हु
हंगामानुसार शेतमाल
कापुस
मुंग
उडीद
ज्वारी
१० तीळ